share market esakal
अर्थविश्व

सोमवारीही शेअर बाजारात पडझड! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

सोमवारी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी कमकुवत जागतिक संकेत आणि कमकुवतपणाने बाजारातील वातावरण खराब राहिले.

शिल्पा गुजर

सोमवारी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी कमकुवत जागतिक संकेत आणि कमकुवतपणाने बाजारातील वातावरण खराब राहिले.

शेअर बाजारात (Share Market) नव्या आठवड्यातही निराशाच पदरी पडली. कारण सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी कमकुवत जागतिक संकेत आणि कमकुवतपणाने बाजारातील वातावरण खराब राहिले. दिवसाअंती सेन्सेक्स (Sensex) 1545.67 अंकांनी म्हणजेच 2.62 टक्क्यांनी घसरून 57,491.51 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 468.05 अंकांनी अर्थात 2.66 टक्क्यांनी घसरून 17,149.10 वर बंद झाला.

आगामी फेड बैठकीपूर्वी कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम दिसून आला आणि त्यामुळेच बाजारात मोठी घसरण झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. या घसरणीचा सर्वात मोठा बळी नव्या टेक्नोलॉजीवर आधारित शेअर्सना बसला. यामध्ये, FII ने मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती.

यापुढेही बाजारात प्रचंड अस्थिरता असेल असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. गुंतवणूकदार फेड बैठकीच्या निकालाची वाट पाहत आहेत. शिवाय, अर्थसंकल्पपूर्व अनिश्चितता, कॉर्पोरेट निकालांचा हंगाम आणि मंथली एक्सपायरी यामुळे हो अस्थिरता आणखी वाढेल असेही त्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत, रिस्क मॅनेजमेंटकडे लक्ष द्यावे लागेल असे ते म्हणाले. दुसरीकडे, गुंतवणूकदार या घसरणीला चांगल्या किमतीत दर्जेदार स्टॉक खरेदी करण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले.

निर्देशांक पुढे कमजोर राहण्याची शक्यता असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीमध्ये 17150 च्या वरचा मजबूत ट्रेड बाजारात दिलासा देऊ शकतो. दुसरीकडे, जर तो 17,150 च्या खाली घसरला तर ही घसरण 17000 पर्यंत जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

आजचे टॉप 10 शेअर्स ?

- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

- बजाज फायनान्स (BAJFINANCE)

- टाटा स्टील (TATASTEEL)

- ग्रासिम (GRASIM)

- हिंदाल्को (HINDALCO)

- अॅस्ट्रल (ASTRAL)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

- झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

- आयडिया (IDEA)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat Election : नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी निर्णय

Indian Railway: रेल्वेतील चहा-नाश्ताच्या जादा वसुलीला ब्रेक लागणार! आयआरसीटीसीची नवी योजना

Tractor Accident : हृदय पिळवटणारी घटना! आईचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् सख्ख्या बहीण-भावाचा माऊलीच्या डोळ्यादेखत झाला अंत

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

IND vs SA : शुभमन गिल OUT, ७ खेळाडू IN ! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघात झाले बदल

SCROLL FOR NEXT