अर्थविश्व

बाजार सलग सहाव्या दिवशी चढतीकडे मार्गस्थ

वृत्तसंस्था

मुंबई - भारतीय शेअर बाजारातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील स्टॉक्सनी आज सलग सहाव्या दिवशी वृद्धी करणा-या व्यापारासाठी इंधन पुरवण्याचे काम कले. निफ्टी ८२.४५ अंक म्हणजेच ०.८३% वाढून १०,०६१.५५ अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्सदेखील २८४.०१ अंकांची किंवा ०.८४%ची बढत घेत ३४,१०९.५४ अंकांवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील ११ पैकी ९ सेक्टरल्सनी आज हिरव्या रंगाची स्थिती दर्शवली. यात निफ्टी पीएसयू बँक इंडेक्सनी नेतृत्व केले. यात आज ५ टक्क्यांची वृद्धी झाली. इतर निफ्टी निर्देशांकात निफ्टी बँक, रिअॅलिटी, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट बँकांचा समावेश असून यांनी जवळपास १-३ टक्क्यांनी वृद्धी घेतली.

प्रमुख लाभधारकांमध्ये कोटक महिंद्रा (३.११% ), आयसीआयसीआय बँक (२.६१%), एमअँडएम (५.४३%), बजाज फायनान्स (३.१५%) आणि नेस्ले (२.६८%) यांचा समावेश होता तर एनटीपीसी (१.९६%), विप्रो (१.७४%), भारती इन्फ्राटेल (१.९५%), झी एंटरटेनमेंट (१.९९%), आणि इंडसइंड बँक (१.५१%) हे टॉप लूझर्समध्ये समाविष्ट होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जागतिक बाजारपेठ: जागतिक बाजारानेही वृद्धीची दिशा कायम ठेवून तीन महिन्यातील उच्चांकाला स्पर्श केला. एमएससीआय वर्ल्ड इक्विटी इंडेक्स ४९ देशांतील शेअर्सचे प्रतिनिधीत्व करते. हा इंडेक्स ६ मार्च २०२० नंतर आज सर्वोच्च स्तरावर पोहोचला.

कमोडिटीजमध्ये तेलाच्या किंमती वाढल्या. मार्च २०२० पासून या किंमतींनी प्रथमच ४० डॉलर प्रति बॅरल एवढे मूल्य गाठले. कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या संकटातून सुधारणेचे संकेत आणि अमेरिकी इन्व्हेंटरीच्या खालावलेल्या पातळीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT