Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market : चौथ्या दिवशी बाजारात पडझड; सेन्सेक्सची 51 अंकानी घसरण

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update : या आठवड्यातील पहिल्या तीन दिवसांत शेअर बाजारात चांगली तेजी पहायला मिळाली होती पण आज शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून सेन्सेक्स 51 अंकानी घसरत 58,298 वर बंद झाला तर निफ्टी 6 अंकाच्या घसरणीसह 17,382 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज चांगलाच फटका बसल्याचं चित्र आहे. दरम्यान या आठवड्यातील सुरूवातीच्या तिनही दिवशी बाजारात चांगली तेजी दिसून आली होती.

(Share Market Update)

आज शेअर बाजारात आज काही शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने CIPLA, NESTLEIND, SUNPHARMA आणि INFY या शेअर्समध्ये आज लक्षणीय वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर NTPC, TATACONSUM, COALINDIA, SHREECEM या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे. तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या सरासरीमध्ये घसरण झाल्यामुळे आज गुंतवणुकदारांच्या खिशाला कात्री लागली आहे.

मागच्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी आणि या आठवड्यातील पहिल्या तिनही दिवशी बाजारात लक्षणीय वाढ दिसून आली होती. पण आज बाजारात पडझड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT