Today's Share Market Updates | Stock Market News sakal media
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराची उसळी; सेन्सेक्स 895 तर निफ्टीमध्ये 256 अंकांची वाढ

दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजाराने दिवसअखेर कामगिरीत सातत्य राखले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: शेअर बाजाराला काल गवसलेला सुरु आजही कायम राहिला. दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजाराने दिवसभर सातत्यपूर्ण कामगिरी केली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली. सेन्सेक्स 874.18 अंकांनी अर्थात 1.53 टक्क्यांनी वधारून 57911.68वर बंद झाला. तर निफ्टी 256.05 अंकांनी म्हणजेच 1.49 टक्क्यांनी वधारून 17,392.60वर बंद झाला. निफ्टीमधील 42 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 8 शेअर्समध्ये घट झाली. EICHERMOT, COALINDIA,M&M, MARUTI, ADANIPORTS हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. तर CIPLA, HINDALCO, TATASTEEL, ONGC या शेअर्समध्ये घट नोंदवली गेली.

तत्पूर्वी आज विकली एक्सपायरीच्या दिवशी दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आजच्या दिवसाच्या सुरुवातील वधारले. सेन्सेक्स 421.1अंकांनी वधारून 57,458.60वर सुरु झाला तर निफ्टी 98.05 अंकांनी वधारून 17,234.60 सुरु झाला. निफ्टी 50 मधील 44 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील घट झाली, तर केवळ 6 शेअर्समध्ये वधारल्याचं पाहायला मिळालं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला COALINDIA, ADANIPORTS, MARUTI, APOLLOHOSP हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले आहेत. तर NESTLEIND, BAJAJ-AUTO, HINDALCO, BRITANNIA या शेअर्समध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं.

तत्पूर्वी काल बुधवारी भारतीय शेअर बाजाराच्या मागच्या 5 दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. या तेजीत ऑटो, ऑईल अँड गॅस, आयटी, फार्माशिवाय एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्सचे मोठे योगदान राहिले. दिवसाअंती सेन्सेक्स 574.35 अंकांच्या अर्थात 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 57,037.50 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 177.80 अंकाच्या अर्थात 1.05 टक्क्यांच्या वाढीसह 17,136.50 बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

Mars Transit in Aquarius 2026: कुंभ राशीत 45 दिवस मंगळाचा प्रभाव; मेष, कन्यासह अनेक राशींचे भाग्य उजळणार; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Nashik Ring Road : शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा नको; खासदार राजाभाऊ वाजेंच्या मध्यस्थीनंतर रिंगरोडचा मार्ग बदलणार?

SCROLL FOR NEXT