Share Market Holiday 2023  Sakal
अर्थविश्व

Share Market Holiday 2023 : नवीन वर्षात शेअर बाजाराला असतील 'एवढ्या' सुट्ट्या; पहा यादी

शेअर मार्केटमधील साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त असे बरेच दिवस असतात ज्यात सण, राष्ट्रीय सण आणि वर्धापन दिनांमुळे शेअर मार्केटमध्ये सुट्टी असते.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Holiday 2023 : आजपासून नवीन वर्ष 2023 सुरू झाले आहे. 2022 हे वर्ष शेअर मार्केटमध्ये चढ-उतारांनी भरलेले होते आणि गेल्या वर्षी अनेक कंपन्यांनी त्यांचे IPO लॉन्च केले आहेत.

तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर, तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, या वर्षी शेअर मार्केटमध्ये किती दिवस ट्रेडिंग होणार नाही.

शेअर मार्केटमधील साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त असे बरेच दिवस असतात ज्यात सण, राष्ट्रीय सण आणि वर्धापन दिनांमुळे शेअर मार्केटमध्ये सुट्टी असते. याविषयी जाणून घेऊयात.


हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

भारतीय स्टॉक एक्स्चेंजने 2023 साठी त्यांच्या सुट्टीची यादी जारी केली आहे. या यादीनुसार 2023 मध्ये वीकेंडच्या सुट्ट्या वगळता 15 दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. जानेवारी महिन्यातील पहिली सुट्टी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असेल. याशिवाय होळी, रामनवमी, दिवाळी या सणांमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

2023 मध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद :

26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन

7 मार्च - होळी

30 मार्च - राम नवमी

4 एप्रिल- महावीर जयंती

7 एप्रिल - गुड फ्रायडे

14 एप्रिल - आंबेडकर जयंती

1 मे - महाराष्ट्र दिन

28 जून - बकरी ईद

15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

19 सप्टेंबर - गणेश चतुर्थी

2 ऑक्टोबर - गांधी जयंती

24 ऑक्टोबर - दसरा

14 नोव्हेंबर - दिवाळी

27 नोव्हेंबर - गुरु नानक जयंती

25 डिसेंबर - ख्रिसमस

दिवाळीच्या दिवशी मुहूर्त खरेदी करण्याची परंपरा भारतीय शेअर बाजारात वर्षानुवर्षे सुरू आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.

यानंतर शेअर बाजार फक्त एक तासासाठी उघडतो आणि या दिवशी गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग करतात. या वर्षीही शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. हे ट्रेंडिंग 14 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT