sensex market
sensex market 
अर्थविश्व

Share Market : बाजारात पुन्हा उसळी; सेन्सेक्स 51 हजाराच्या पार; निफ्टीची ऐतिहासित मजल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो रेटची घोषणा केली. या दरम्यानच आज शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये उसळी दिसून आली. शेअर बाजार आज या विक्रमी उसळीनेच उघडलेला पहायला मिळाला. आज सेन्सेक्सने पुन्हा एकदा 50 हजार अंकांचा टप्पा पार केला आहे. तीस शेअर्सवाल्या बीएसईच्या निर्देशांकात आज 417 अंकांची वाढ पहायला मिळाली. यानंतर सेन्सेक्स 51,031 वर गेलेला पहायला मिळाला. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 73 अंकांनी वाढून 14,968 अंकांवर पोहोचला. निफ्टीने देखील 15,005 चा टप्पा गाठून नवा रेकॉर्ड केला. 

मार्केट उघडल्यानंतर आज सकाळी 9.16 ला सेन्सेक्स 216.47 अंकांनी तेजी गाठून 50,830.76 च्या टप्प्यावर तर निफ्टी 73.30 च्या वाढीसह 14,968.95 अंकावर होता. पुढे सेन्सेक्सने 0.64 टक्क्यांची आणखी वाढ घेऊन 325 अंकांच्या वाढीसह 51,000 चा टप्पा पार केला तर निफ्टी 50 देखील 15,000 च्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर पोहोचला. 10.40 वाजता सेन्सेक्स 0.52 टक्क्यांसह 263 अंकांनी वाढून 50877 वर ट्रेंड करत होता. तर निफ्टी जवळफास 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 14,940 च्या आसपास होता. 

MPC च्या आजच्या घोषणेमध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कसलाही बदल करण्यात आला नाहीये. याचा अर्थ असा आहे की, रेपो रेट 4 टक्क्यांवरच राहिल. तर रिव्हर्स रेपो रेटला 3.35 टक्क्यांवर ठेवण्यात आलं आहे. कमिटीने 2021-22 मध्ये जीडीपी ग्रोथ 10.5 टक्क्यांवर असण्याचा अंदाज वर्तवला होता. कमिटीचं म्हणणं होतं की जीडीपीची ग्रोथ मार्गावर अणण्याचं सध्याचं ध्येय आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT