Share Market Sakal
अर्थविश्व

ओमिक्रॉनची भीती; शेअर बाजारात काही मिनिटात १० लाख कोटींचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

सेन्सेक्सच्या (Sensex) निर्देशांकात सकाळी साडे दहा वाजेपर्यंत तब्बल १३०० पेक्षा जास्त घसरण झाली होती.

जगभरात सध्या ओमिक्रॉनची (Omicron) चिंता सतावत आहे. याचा परिणाम भारतात शेअर बाजारावरही (Share Market) दिसून येत आहे. शेअर बाजारात सोमवारी (Monday) मोठी घसरण झाली. सेन्सेक्सच्या (Sensex) निर्देशांकात सकाळी साडे दहा वाजेपर्यंत तब्बल १३०० पेक्षा जास्त घसरण झाली होती. ही घसरण जवळपास अडीच टक्के इतकी आहे. यामुळे सेन्सेक्स ५५ हजार ६६२ अकांवर आला आहे. तर निफ्टीतही (Nifty) २.२५ टक्के घसरणीसह निर्देशांक १६ हजार ६०३ अंकांवर होता.

शेअर बाजारात या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल दहा लाख कोटींचे नुकसान झाले. अवघ्या दहा मिनिटात बाजार भांडवल तब्बल १०.४७ लाख कोटींनी कमी झाले. शुक्रवारी बाजार भांडवल हे २६४.०३ लाख कोटी रुपये इतकं होतं ते आता २५३.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

ओमिक्रॉनमुळे युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जात आहेत. यामुळे पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेला दणका बसण्याची शक्यता आहे. यातच आज आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आशियाई बाजारही आज घसरलेलाच होता. कच्च्या तेलाच्या बाजारातही घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्समध्ये चार टक्क्यांची घसऱण झाली. तर टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी , एचडीएफसी बँक यांच्यातही मोठी घसरण झाल्याचं दिसतं. मात्र सन फार्माचे शेअर्स वधारलेले दिसत होते.

आशियाई शेअर बाजाराप्रमाणेच वॉल स्ट्रिटसुद्धा घसरणीत सुरु आहे. ओमिक्रॉनचे संकट आणि फेडरल रिझर्व्ह पॉलिसी याचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय. ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारातही १९ अंकांनी घसरण झाली तर निक्कीमध्ये ६१३ अंकांची तर शांघायमध्ये ३१ अंकांची घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT