Share Market
Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market : बजेटपूर्वी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय? तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

Budget 2023 :  देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प काही आठवड्यांत सादर होणार आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देश 2023 च्या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारही आगामी अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे.

मात्र, अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या व्यापारी आठवड्यातच बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली आहे.

यासोबतच काही क्षेत्रांमध्ये दबावही दिसून आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बजेटपूर्वी शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

बजेटपूर्वी बाजारात चढ-उतार होऊ शकतात. अशा स्थितीत घाबरून गेल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका आणि चुकीचा निर्णय घेऊ नका. जर तुम्ही चुकीचा निर्णय घेऊन शेअर विकलात तर मोठा तोटा होऊ शकतो.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

तिमाही निकाल पहा :

जानेवारी महिन्यात, अनेक कंपन्या त्यांचे ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाही निकाल जाहीर करतील. अशा परिस्थितीत लोकांनी त्या कंपन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवले पाहिजे.

जर एखाद्या कंपनीचे निकाल चांगले आले नाहीत किंवा चांगले आले असतील तर त्यानुसार अर्थसंकल्पापूर्वी कंपनीबाबत निर्णय घ्यावा. याचाही मोठा फायदा होऊ शकतो.

एक पोर्टफोलिओ तयार करा :

विविध क्षेत्रांच्या फायद्यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या क्षेत्रांकडून एक पोर्टफोलिओ अगोदरच तयार केला जाऊ शकतो.

जेणेकरुन अर्थसंकल्पात यापैकी कोणत्याही क्षेत्राबाबत कोणतीही महत्त्वाची घोषणा केली गेली तर त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT