Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बँक ऑफ जपानने जगभरातील बाजारपेठांना मोठा धक्का दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मंगळवारी बाजाराची सुरुवात अतिशय संथ झाली. बँक ऑफ जपानने चलनविषयक धोरण घट्ट होण्याची चिन्हे दिल्यानंतर बाजारात कमजोरी दिसून आली. पण व्यवहाराच्या शेवटच्या तासात बाजारात जोरदार रिकव्हरी झाली. त्यामुळे बाजार खालच्या पातळीवरून सुधारत बंद झाला.

निफ्टी तळापासून 182 अंकांनी सुधारून बंद झाला आहे. दुसरीकडे, सेन्सेक्स तळापासून 600 अंकांनी सुधारून बंद झाला आहे. निफ्टी बँक 460 अंकांनी सुधारून बंद झाला आहे. एनर्जी, आयटी आणि मेटल इंडेक्स वाढीसह बंद झाले. तर रियल्टी, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 104 अंकांनी घसरून 61,702 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 35 अंकांनी घसरला आणि 18385 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 54 अंकांनी घसरून 43360 वर बंद झाला. तर मिडकॅप 70 अंकांनी घसरून 32117 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक ऑफ जपानने जगभरातील बाजारपेठांना मोठा धक्का दिल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. यामध्ये, त्यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या बाँडच्या उत्पन्नाची अप्पर बँड लिमिट 50 बेसिस पॉइंटने वाढवली.

बँक ऑफ जपानचे हे पाऊल आर्थिक धोरणे कडक करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल मानले जात आहे. त्यामुळे आधीच मंदीची भीती असलेल्या जागतिक बाजारात विक्रीचा दबाव आणखी वाढला. या वातावरणात अमेरिकेच्या जीडीपीचे आकडेही गुरुवारी येतील, यातून युएस इकॉनॉमीचा अंदाज लावता येईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  1. एसबीआय लाईफ (SBILIFE)

  2. आयशर मोटर्स (EICHERMOT)

  3. युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  4. टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  5. हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  6. गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  7. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  8. झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  9. पर्सिस्टंट (PERSISTENT)

  10. हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT