liquor stocks
liquor stocks sakal
अर्थविश्व

Liquor stocks :व्होडका-व्हिस्की विकणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल...

सकाळ डिजिटल टीम

रॅडिको खेतानने (Radico Khaitan) मागच्या काही वर्षांत गुंतवणुकदारांची संपत्ती 128 टक्क्यांनी वाढवली आहे. पण मागच्या 11 महिन्यांत हे शेअर्स जवळपास 23 टक्क्यांनी घसरले आहेत. पण, लाँग टर्ममध्ये याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 128 पटीने वाढ झाली आहे.

मागच्या सहा महिन्यांत ते 35 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहे. शुक्रवारी बीएसईवर हे शेअर्स 997.85 रुपयांवर ट्रेड करत होते. रॅडिको खेतानची मार्केट कॅप 13,338.64 कोटी रुपये आहे. (liquor stock Radico Khaitan latest update)

20 जून 2003 रोजी रॅडिको खेतान लिमिटेडचे शेअर्स केवळ 7.78 रुपयांवर होते, जे आता 997.85 रुपयांपर्यंत वाढले आहेत. म्हणजे त्यावेळी एखाद्याने यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज 19 वर्षांनंतर याची किंमत 1 कोटी 28 लाखांपर्यंत पोहोचली असती.  

या वर्षी 6 जानेवारी रोजी रॅडिकोचे शेअर्स 1299.85 रुपयांवर होते, जो एका वर्षातील उच्चांक आहे. पण, यानंतर, शेअर्सवर विक्रीचा दबाव आला आणि 12 मे 2022 पर्यंत हे शेअर्स 44 टक्के घसरून 731.35 रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतर किमतीत रिकव्हरी झाली आणि आतापर्यंत 36 टक्के वसुली झाली आहे.

रॅडिको खेतान ही देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी कंपनी आहे. आधी त्याचे नाव रामपूर डिस्टिलरी होते आणि त्याचा व्यवसाय 1943 मध्ये सुरू झाला. त्यांच्या उत्पादनात 8PM व्हिस्की, मॅजिक मोमेंट्स वोडका, कॉन्टेसा XXX रम आणि ओल्ड ऍडमिरल ब्रँडीसह 15 पेक्षा जास्त ब्रँड आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजप नाराज? पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

SCROLL FOR NEXT