share market esakal
अर्थविश्व

Share Market Opening : सेन्सेक्स 289 अंकांच्या वाढीसह 61993 वर उघडला; 'या' शेअर्समध्ये वाढ

आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टी तेजीने उघडले.

सकाळ डिजिटल टीम

आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टी तेजीने उघडले. शेअर बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्स 291.42 अंकांच्या म्हणजेच 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 61,993.71 वर उघडला. NSE चा निफ्टी 49.85 अंकांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 18,435.15 वर उघडला.

BSE India

आज बँकिंग, ऑटो, आयटी आणि पीएसयू बँक निर्देशांकात तेजी आहे. एचसीएल टेक, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस या समभागांमध्ये तेजी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.75 वर सपाट झाला.

आज आशियाई बाजारांमध्येही तेजीने व्यवसाय सुरू आहे. केवळ जपानचे निक्केई, एसटीआय आणि मलेशियाचे बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. मात्र, हँगसेंग, शांघाय कंपोझिट, कोस्पी, तैवानच्या बाजारात वाढीचे हिरवे चिन्ह दिसत आहे.

निफ्टीवर या समभागांमध्ये तेजी :

निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यवहारात अपोलो हॉस्पिटल्स 1.11 टक्क्यांनी सर्वाधिक वाढला. याशिवाय एचसीएल टेक, यूपीएल, एचडीएफसी लाइफ आणि हिंदाल्को यांचे शेअर्सही सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होते.

या समभागांमध्ये घसरण :

निफ्टीवर डॉ. रेड्डीज, भारती एअरटेल आणि एल अँड टी शेअर्स लाल चिन्हासह व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT