Share Market Latest News Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार कोसळला; निफ्टी-50 मधील सर्व शेअर्समध्ये घसरण

सकाळी 9.30 वाजेपर्यंत निफ्टी 50 मधील सर्वच्या सर्व 50 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: बुधवारी रिझर्व बँकेने (Reserve Bank) रेपो दरात वाढ केल्यानंतर शेअर बाजार कोसळला होता. परंतु काल मात्र शेअर बाजार स्थिर राहिला. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले आहेत. सेन्सेक्स आज 773.94 अंकांनी कोसळून 54,928.29 वर सुरु झाला. सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजेपर्यंत 54,721.78ची पातळी गाठली होती. तर निफ्टी 267.1अंकांच्या घसरणीसह 16,415.55 वर सुरु झाला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत निफ्टी 50 मधील सर्वच्या सर्व 50 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते. सकाळी 9.40 वाजेपर्यंत M&M, HEROMOTOCO, RELIANCE, ITC, COALINDIA, POWERGRID या शेअर्समध्ये वाढ दिसू लागली. मात्र अन्य 44 शेअर्समधील घसरण कायम होती.

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर बुधवारी बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात आशियाई बाजारातही चांगली तेजी पाहायला मिळाली. पण, शेवटी जगभरातील सर्वच बाजारांचा नफा कमी होऊन सपाट बंद झाल्याचे दिसून आले.

भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद नव्हता. सकाळी जोरदार सुरुवात झाल्यानंतर हळूहळू तो दबावाखाली येऊ लागला आणि दुपारच्या जेवणानंतरच्या ट्रेडिंग सत्रात बाजारावर नफावसुलीचे (Profit Booking) वर्चस्व राहिले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 33.20 अंकांच्या अर्थात 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 55,702.23 वर बंद झाला. निफ्टी 5.05 अंकांच्या अर्थात 0.03 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 16,682.65 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT