Share Market
Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : आज बाजार तेजीसह बंद; बँकांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : भारतीय शेअर बाजारासाठी गुरुवारचा दिवस अतिशय आनंददायी ठरला आहे. आज जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार घसरणीसह उघडला.

परंतु बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे शेअर बाजाराला गती मिळाली. आणि आजच्या व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 223 अंकांनी घसरून 61,133 अंकांवर, तर NSE निफ्टी 85 अंकांच्या वाढीसह 18,207 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातील तेजीचे श्रेय बँक निफ्टीला जाते, आज बँक निफ्टीने 800 अंकांची वाढ नोंदवली आहे. बँकिंगशिवाय निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी मेटल्स, निफ्टी एनर्जी या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.

BSE India

टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती आणि एचडीएफसी हे सेन्सेक्सवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टाटा स्टील आणि भारती एअरटेलचे शेअर्समध्ये तेजी आहे. इतर आशियाई बाजारांमध्ये सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगच्या बाजारात घसरण दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग वाढीसह बंद झाले, तर 10 समभाग घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

उद्या बाजारात भारती एअरटेल (BHARTIARTL), अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP), बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV), ऍक्सिस बँक (AXISBANK), हिन्दाल्को (HINDALCO), एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS) या शेअर्समध्ये तेजी दिसू शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT