share Market mutual fund investment kfintech ipo here all you need to know
share Market mutual fund investment kfintech ipo here all you need to know sakal
अर्थविश्व

Kfintech IPO : 'के फिनटेक' आयपीओ कसा आहे ?

नंदिनी वैद्य nandineevaidya@yahoo.com

भारतीय शेअर बाजार अथवा म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या बहुतेक गुंतवणूकदारांनी ‘के फिनटेक’ हे नाव बरेच ठिकाणी वाचले आहे. या कंपनीने १५०० कोटी रुपयांचा आयपीओ १९ ते २१ डिसेंबर दरम्यान प्राथमिक बाजारात आणला आहे. ‘कॅम्स’नंतर रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट क्षेत्रातील आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी आहे. आयपीओचा किंमतपट्टा ३४७ ते ३६६ रुपये इतका असून, कमीतकमी ४० शेअर व त्याच्यापटीत अर्ज करता येईल.

कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप आणि विस्तार

सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर बहुतांश कंपन्या अथवा म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांशी निगडीत असलेली बरीचशी कामे उदा. शेअर ट्रान्स्फर, बायबॅक, लाभांश वितरण आदी एका बाहेरील कंपनीकडे सुपूर्द करतात. असे काम करणारी कंपनी म्हणजे के फिन टेक्नोलॉजीज होय. कंपनीच्या व्यवसायाचा विचार केला, तर आज देशात ४१ म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यापैकी २४ कंपन्यांचे गुंतवणूकदारांशी संबंधित सर्व व्यवहार; तसेच कंपन्यांचे शेअर ट्रान्सफर, डी-मॅट, रि-मॅट आदी कामे ही कंपनी करते.

रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट म्हणून ‘सेबी’चा परवाना आहेच; पण त्या शिवाय एआयएफ, राष्ट्रीय पेन्शन योजनेची सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी म्हणूनदेखील ही कंपनी काम करते. फक्त देशातच नाही, तर बाहेरील आशियाई देशांमध्येदेखील तिचा व्यवसायविस्तार सुरू आहे. फ्रंटएंड, मिडल ऑफिस, बॅकएंड आणि ‘व्हास’ अशा चार विभागांमध्ये तिचे काम असते. आगामी काळात स्थावर, जंगम मालमत्तेमधील गुंतवणूकमर्यादा लक्षात येत असल्याने बराचसा पैशाचा ओघ शेअर बाजाराकडे वळण्याची शक्यता मोठी आहे. कंपनीची व्यवसायवाढ पूर्णपणे यावरच अवलंबून असल्याने येणाऱ्या काळात त्यांना मोठा वाव मिळणार आहे. साहजिकच उत्पन्न व नफा चांगलाच वाढणार यात काही शंका नाही. तसेही गेल्या दोन वर्षांमधील आर्थिक निकालांमध्ये ते दिसून येत आहेच.

कार्व्ही ब्रोकिंगचा काही संबंध आहे का?

कार्व्ही ब्रोकिंग कंपनीत २०१९ मध्ये जो डी-मॅट खात्यातील शेअरसंदर्भात मोठा घोटाळा झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना शंका आहे, की अजूनही त्यांचा व कंपनीचा काही संबंध आहे का? तर कंपनीला आता हा धोका नाही. कंपनीच्या व्यवस्थापनासह सर्व बाबी बदलल्या आहेत. हे प्रॉस्पेक्टसमध्ये जाहीर केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी निर्धास्त राहण्यास हरकत नाही.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

याबाबत दोन स्तरांवर विचार करावा लागेल. आधी कंपनीची वैयक्तिक स्थिती आणि मग तुलनात्मक विचार. कंपनीच्या व्यवसायाशी साधर्म्य असणारी ‘कॅम्स’ आज दुय्य्यम बाजारात आधीच आहे. उत्पन्नाचा विचार करता ‘कॅम्स’ ही मोठी कंपनी आहे. इतरही बऱ्याच बाबतीत ती सरस दिसत आहे. तरीही ‘के फिनटेक’ने ठेवलेली किंमत ‘कॅम्स’च्या ‘पीई’ रेशोजवळच आहे. तसेच पी/बुक आठच्या जवळ आहे. त्यामुळे इश्‍यू किंमत महाग वाटते. तसेच बराचसा व्यवसाय म्युच्युअल फंडांशी निगडीत किंवा कमी ग्राहकांवर आधारित अधिक व्यवसाय असून, कंपनीविरुद्ध काही प्रलंबित दावे आहेत. अशा काही जोखमींचादेखील विचार करावा लागेल; परंतु आगामी काळात या व्यवसायाला मिळणारा प्रचंड वाव, अद्याप कमी असलेली स्पर्धा याचा विचार करता आयपीओसाठी अर्ज करण्यास हरकत नाही. कमी शेअर मिळाले, तर पुढे जेव्हा बाजारात मंदी असेल व किंमत कमी असेल तेंव्हा थोडे-थोडे शेअर विकत घेऊन दीर्घ कालावधीसाठी ठेवले, तर अधिक फायदा मिळू शकेल.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT