Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market मध्ये मोठी पडझड; 1700 अशांनी कोसळला Sensex

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) आज सोमवारी मोठ्या प्रमाणावर गडगडलेला दिसून आला. दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी ही प्रचंड मोठी घसरण पहायला मिळालेली आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच बीएसई सेन्सेक्स 1400 अंकांपर्यंत घसरला आणि 57,000 च्या खाली आला होता. त्याचवेळी निफ्टीही 17 हजारांच्या खाली घसरला होता. (Share Market News)

आज दिवसभराच्या व्यवहारांनंतर आता सेन्सेक्स 1747.08 अंशांनी म्हणजेच तब्बल 3 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या सेन्सेक्स 56,405 च्या स्तरावर आहे. तर दुसरीकडे निफ्टी 531.95 अंशांनी घसरला असून 16,842 च्या स्तरावर आहे. (Big Fall in Share Market)

आज दोन्ही निर्देशांक लाल निशाण्यावरच होते. मागील काही दिवसांपासून सातत्याने अस्थिर असलेल्या शेअर बाजारातील (Share Market) सोमवारच्या व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आलं आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता दिसून येतीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, कधी जाणून घ्या?

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

Solapur Accident: 'पाच कार एकमेकांवर आदळून विचित्र अपघात'; गर्भवती महिला जखमी; सोलापूर पुणे महामार्गावर घटना..

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT