Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: निवडणूक निकालांनंतर सेन्सेक्समध्ये 246.39 तर निफ्टीमध्ये 66.10 अंकांची घसरण

निवडणूकांच्या दुसऱ्या शेअर बाजार स्थिर पातळीवर सुरु झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Latest Updates: कालच पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल लागले. त्यानंतर आजच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात किंचित घसरणीने झाली. सेन्सेक्स (Sensex) 246.39 अंकांच्या घसरणीसह 55218.78 वर सुरु झाला, तर निफ्टी (Nifty) 66.10 अंकांच्या घसरणीसह 16528 वर सुरु झाला.

दरम्यान गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली असून जागतिक संकेतही सुधारले आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सकारात्मक जागतिक संकेतांमध्‍ये बाजारात गॅप-अप ओपनिंग दिसले आणि त्यानंतर भाजपच्या विजयाच्या शक्यतांसोबतच बाजाराची तेजीही वाढत गेली. पण, व्यवहाराच्या शेवटच्या तासात काही प्रमाणात नफावसुली झाली.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 817.06 अंकांच्या अर्थात 1.50 टक्क्यांच्या वाढीसह 55,464.39 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 249.55 अंकांच्या अर्थात 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 16,594.90 वर बंद झाला. दरम्यान, रशिया आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री तुर्कस्तानमध्ये भेटणार असल्याची बातमी आली. त्यामुळे दोन्‍ही देशांमध्‍ये चर्चेच्‍या माध्‍यमातून चर्चा होण्याची शक्‍यता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT