Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market Opening : बजेटनंतर शेअर बाजारात घसरण सुरूच; अदानींच्या शेअर्सला मोठा धक्का

शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली आहे. गुंतवणूकदारांनी अदानी ग्रुप एंटरप्रायझेसच्या एफपीओची विक्री, माघार घेतल्याने बाजारातील स्थिती बिघडली आहे.

त्यामुळे बीएसईचा सेन्सेक्स 248 अंकांनी घसरून 59.459 अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 100 अंकांनी घसरून 17.517 अंकांवर उघडला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, एफएमसीजी, मीडिया आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. बँकिंग, ऑटो, इन्फ्रा, मेटल, एनर्जी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री होताना दिसत आहे.

BSE India

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभाग वाढीसह आणि 15 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 19 समभाग वाढीसह तर 31 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स वाढले आहेत. स्टेट बँक, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सिटीग्रुपने अदानी सिक्युरिटीजचे मार्जिन लोन फ्रीज करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी क्रेडिट सुइसने अदानी समूहाचे रोखे स्वीकारण्यास नकार दिला होता. आज अदानी एंटरप्रायझेसचा शेअर पुन्हा 10 टक्क्यांनी घसरला आणि तो लोअर सर्किटमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT