Stock Market Opening esakal
अर्थविश्व

Share Market: Sensex मध्ये 450 अंकांची उसळी, विक्रीचा दबाव कायम

आजच्या व्यवसायात भारतीय शेअर बाजार प्रचंड वेगानं पुढं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजच्या व्यवसायात भारतीय शेअर बाजार प्रचंड वेगानं पुढं जात आहे.

Stock Market Opening : आजच्या व्यवसायात भारतीय शेअर बाजार प्रचंड वेगानं पुढं जात आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स प्री-ओपनिंगमध्येच मोठी उसळी घेऊन व्यवहार करत आहे. निफ्टी आज 16800 च्या जवळ सुरू होत असून जी या वर्तमान सिरीजमधील सर्वोच्च पातळी असणार आहे.

शेअर बाजारात आज बीएसई सेन्सेक्स 451.23 अंकांच्या अथवा 0.81 टक्क्यांच्या उसळीसह 56,267 वर उघडलाय. तर, दुसरीकडं NSE चा निफ्टी 133.05 अंकांच्या किंवा 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 16,774 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे. आजच्या व्यवहारात निफ्टीच्या 50 पैकी 38 शेअर्स उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. बँक निफ्टीतही मजबूत तेजीची नोंद होत आहे. बँक निफ्टीनं 418 अंकांनी म्हणजेच, 1.14 टक्क्यांनी वर राहून 37200 चा टप्पा पार केलाय.

बँक, वित्तीय आणि आयटी शेअर्समध्ये आज क्षेत्रीय निर्देशांकात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. फार्मा, मीडिया, एफएमसीजी आणि हेल्थकेअर निर्देशांक घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहे. आज चढलेल्या क्षेत्रांमध्ये आयटी शेअर्स 1.37 टक्के, वित्तीय शेअर्स 1.26 टक्के आणि बँक शेअर्स 1.12 टक्क्यांनी वाढले आहेत.

आजच्या वाढत्या स्टॉकचे चित्र

आज सेन्सेक्स चढणाऱ्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टाटा स्टील, इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक 5.55-1.65 टक्क्यांनी वाढ नोंदवत आहेत. दुसरीकडं विप्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेसह एशियन पेंट्सही तेजीत आहेत.

आजचे घसरलेले स्टॉक

आजच्या घसरलेल्या शेअर्सवर नजर टाकल्यास NTPC, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडस्ट्रीज, ITC, भारती एअरटेल, सन फार्मा आणि डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज सेन्सेक्समध्ये 1.20-0.74 टक्क्यांच्या दरम्यान व्यवहार करत आहेत.

प्री-ओपनिंगमध्ये व्यापार कसा होता?

जर आपण प्री-ओपनिंग ट्रेडवर नजर टाकली, तर बीएसई सेन्सेक्स 444 अंकांच्या उसळीसह 56260.19 वर व्यवहार करत होता. तर, दुसरीकडं NSE चा निफ्टी 97.90 अंकांनी वाढून 16739.75 वर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT