share market Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

आजही शेअर बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिली दिवशी शेअर बाजार गडगडला त्यानंतर आज शेअर बाजारात व्यवहाराची सुरुवात सावध झाली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली. त्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली. आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली. सुरवातीला सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

जागतिक बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसल्यामुळे आणि सेंट्रल बँकांच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. येत्या काळातही बाजार सावध राहील आणि बुधवारच्या एफओएमसीवर सर्वांचे लक्ष असेल.

निफ्टीला 17050 च्या जवळ सपोर्ट आहे आणि इथून त्याने चांगली वाढ केली आहे. निफ्टीने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. त्याच बरोबर, त्याने रिव्हर्सल फॉर्मेशन तयार केले आहे. निफ्टी 17150 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर आपण पुन्हा एकदा 17400-17450 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17150 च्या खाली घसरला तर ही घसरण 17050-17000 पर्यंत जाऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUME)

  • हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)

  • आयटीसी (ITC)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • पेज इंडिया (PAGEINDIA)

  • डिक्सन (DIXON)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRITRANSFIN)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत घराचा स्लब कोसळून 1 जण जखमी

Sahyadri Tiger Reserve : वाघांच्या वाढीसाठी राधानगरी ठरतंय 'सेफ झोन'; सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर 'राणोजी'वर शिक्कामोर्तब! पर्यटनाला मिळणार गती

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT