Share Market Latest Updates
Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 108 अंकांनी खाली

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मकता दिसून आली होती. गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती. आज मात्र सुरवातीच्या सत्रात शेअर बाजाराची सुरवात घसरणीसह सुरू झाला आहे. आज बाजारात सेन्सेक्स 108 अंकाच्या घसरणीसह 61,492 वर सुरू झाला तर निफ्टी 22 अंकाच्या घसरणीसह 18,296 वर सुरू झाला. आज सुरवातीच्या सत्रात 27 शेअर्समध्ये तेजी तर 21 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ( share market update 1November 2022)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजारात कमी प्रमाणात व्यवहार झाले. स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी, तर मिडकॅप शेअर्स फ्लॅट बंद झाले. मेटल रियल्टी, आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. त्याचप्रमाणे एफएमसीजी आणि कंझ्युमर गुड्सच्या शेअर्समध्येही विक्री झाली.

निफ्टी बँक 60 अंकांनी घसरून 42077 वर बंद झाला. मिडकॅप 17 अंकांनी वाढून 31399 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्स विकले गेले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्समध्ये खरेदी झाली.

सोमवारी मंदीच्या वातावरणात मार्केट साइडवेज व्यवसाय करताना दिसला आणि शेवटी लाल चिन्हाने बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. गेल्या आठवड्यातील जोरदार तेजीनंतर व्यापारी प्रॉफीट बुक करताना दिसले.

आता कच्च्या तेलाच्या किमती आणि चलनाबाबत कोणतीही नकारात्मक बातमी आली तर आणखी प्रॉफीट बुकिंग पाहायला मिळू शकते. निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी बियरीश कँडल तयार केली आहे.

निफ्टीला आता 18250 आणि 18200 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. निफ्टी या सपोर्टच्या वर टिकून राहिल्यास त्यात 18390 ची पातळी दिसू शकते. यानंतर निफ्टीही 18500 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT