Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Marketमध्ये अस्थिरता, मात्र आयटी शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार हलक्या तेजी सह सुरू झाला.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. गुरुवारी शेअर बाजारमध्ये घसरण दिसून आली होती पण बाजार बंद होताना मात्र बाजार सावरल्याचं चित्र दिसून आलं.

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार हलक्या तेजी सह सुरू झाला. सेन्सेक्स 52 अंकाच्या तेजीसह 60,350 वर सुरू झाला तर निफ्टी 16 अंकाच्या तेजीसह 17,973 वर सुरू झाला. याशिवाय आज शेअर बाजारात 32 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर 12 तेजीसह सुरू झाला. यात विशेषत: आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

शेअर बाजारात गुरुवारी अस्थिरतेचे वातावरण दिसून आले. सकाळी बाजार लाल चिन्हात उघडला पण नंतर हिरव्या चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स सुमारे 66.61 अंक अर्थात 0.11% च्या वाढीसह 60,326.74 वर बंद झाला, तर निफ्टी केवळ 20.95 अंकांच्या अर्थात 0.12% च्या वाढीसह 17,965.20 वर बंद झाला.

गुरुवारी जागतिक बाजारातून कमजोर संकेत दिसले. पाच दिवसांच्या सततच्या वाढीनंतर अमेरिकन बाजारात घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स 172 अंकांनी घसरला आणि 33,980 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय Nasdaq 165 अंकांनी घसरला. SGX निफ्टी 50 अंकांच्या कमजोरीसह 17950 च्या खाली घसरला. जपानचा निक्केई 300 अंकांनी घसरला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • एल अँड टी (LT)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUMERS)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTCEMCO)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

  • आयआरसीटीसी (IRCTC)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • डिक्सन (DIXON)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT