Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: घसरणीला ब्रेक, Sensex- Nifty तेजीत

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा शेअर बाजार बुधवारी लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद झाला. मात्र आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 120 अंकाच्या तेजीसह 51,940 वर सुरू झाला तर निफ्टी 35 अंकाच्या तेजीसह15,450 वर सुरू झाला. शेअर बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत असल्याने दिवसभरातील शेअर बाजारातील स्थिती कशी राहील, हे पाहणे गरजेचे आहे. (Share Market Updates)

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 709.54 अंकांनी म्हणजेच 1.35 टक्क्यांनी घसरून 51,822.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 225.50 अंकांनी म्हणजेच 1.44 टक्क्यांनी घसरून 15,413.30 वर बंद झाला.

निफ्टीने बुधवारच्या व्यवहारात जवळपास सर्व नफा गमावल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. आशियाई बाजारातील कमजोरीमुळे भारतीय बाजारांत खराब वातावरण दिसले, आता बाजाराच्या नजरा यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे लागल्या आहेत. बाजार पुन्हा एकदा दबावाखाली आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. युरोपियन आणि आशियाई बाजारातील कमजोरीमुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे मेटल, पॉवर, रियल्टी शेअर्समध्ये घसरण झाली.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बीपीसीएल (BPCL)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)

डिवीस लॅब (DIVISLAB)

टीसीएस (TCS)

पॉवर ग्रीड (POWERGRID)

युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

हिन्दाल्को (HINDALCO)

टाटा स्टील (TATASTEEL)

जेएसडबल्यू स्टील (JSWSTEEL)

ओएनजीसी (ONGC)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT