Share Market News Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात अस्थिरता? सेन्सेक्स 224 तर निफ्टी 55 अंकांनी घसरला

काल शेअर बाजाराच्या पहिल्या सत्राची सुरवात घसरणीसह झाली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

शेअर बाजारात आजही अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. काल शेअर बाजाराच्या पहिल्या सत्राची सुरवात घसरणीसह झाली होती. त्यानंतरच्या काही वेळेत बाजार सावरला. आजही शेअर बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.

आज बाजारात सुरुवातीला शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 224 अंकांच्या घसरणीसह 58,806 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 55 अंकांच्या घसरणीसह 17,509 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते.

मंगळवारी सलग दोन दिवसांची बाजारातील घसरण थांबली आणि सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. शेवटी, सेन्सेक्स 257.43 अंकांच्या अर्थात 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 59,031.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 86.80 अंकांनी अर्थात 0.50 टक्क्यांनी वाढून 17,577.50 वर बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • टायटन (TITAN)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • ट्रेंट (TRENT)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT