Share
Share Sakal
अर्थविश्व

Share Market मध्ये तेजी, Sensex 530 अंकानी वधारला

सकाळ डिजिटल टीम

या आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. गुरूवारी घसरणीला ब्रेक देत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा शेअर बाजारात तेजी कायम राहील, असे संकेत मिळतेय. कारण आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 530 अंकाच्या तेजीसह 52,804 वर सुरू झाला तर निफ्टी 165 अंकाच्या तेजीसह 15,722 वर सुरू झाला. (Share Market Updates)

गुरुवारी शेअर बाजार हिरव्या रंगात अर्थात वाढीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 443.19 अंकांच्या म्हणजेच 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 52,265.72 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 143.35 अंकांच्या म्हणजेच 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 15556.65 वर बंद झाला (share market opening update 24 june 2022)

विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता होती पण व्यापाराच्या शेवटी तो हिरव्या चिन्हात बंद झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर निफ्टीने आदल्या दिवशीच्या घसरणीनंतर जोरदार रिकव्हरी नोंदवली. डेली RSI पॉझिटीव्ह डायव्हर्जन दाखवत आहे, जे येत्या काळात बाजारासाठी चांगले संकेत आहेत.
खाली निफ्टीला 15,400 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी 15,400 च्या खाली घसरला तर बाजारात विक्री दिसून येईल. वरच्या बाजूला, निफ्टीला 15,600/15,800 वर रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

मारुती (MARUTI)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)

आयशर मोटर्स (EICHERMOTORS)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

रिलायन्स (RELIANCE)

पॉवर ग्रीड (POWERGRID)

कोल इंडिया (COALINDIA)

एनटीपीसी (NTPC)

ग्रासिम (GRASIM)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT