Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात तेजी, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाारात तेजी दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता कायम आहे. दमदार जागतिक संकेतांसह गुरुवारी बाजारात अतिशय सकारात्मक वातावरण दिसून आले तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाारात तेजी दिसून येत आहे.

आज शेअर बाजारात सेन्सेक्स 212 अंकाच्या तेजीसह 59,756 वर सुरू झाला तर निफ्टी 80 अंकाच्या तेजीसह 17,736 वर सुरू झाला. (share market opening update 28 october 2022)

गुरुवारी ऑक्टोबर एक्स्पायरीच्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला. आयटी वगळता सर्व क्षेत्र निर्देशांकात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 213 अंकांनी वाढून 59 हजार 757 वर बंद झाला. तर निफ्टी 81 अंकांनी वर चढून 17 हजार 737 वर बंद झाला.

मिडकॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. रियल्टी, मेटल, एनर्जी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यासोबतच फार्मा, एफएमसीजी शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरवातीच्या सत्रात 32 शेअर्समध्ये तेजी तर 18 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • हिंदाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • पॉवर ग्रीड (POWERGRID)

  • भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

  • भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड (BEL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ट्रेंट (TRENT)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT