Share Market News Updates Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात अस्थिरता; घसरणीसह बाजाराची सुरुवात

आजही सकाळच्या सत्रात शेअर बाजारात अस्थिरता

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीला पहिले दोन दिवस शेअर बाजारात तेजी दिसून आली त्यानंतर शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. पण आजही सकाळच्या सत्रात शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. सेन्सेक्स 0.14 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टीही 0.13 अंकांनी घसरणीसह ट्रेड करत आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 87 अंकाच्या घसरणीसह 60,829 वर सुरू झाला तर निफ्टी 23 अंकाच्या घसरणीसह 18,059 वर सुरू झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सुमारे 1 आठवड्याच्या मजबूत तेजीनंतर बुधवारी यूएस फेडच्या निर्णयापूर्वी बाजार सुस्त दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस फेडने अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर वाढवल्यास जागतिक बाजारपेठेत मोठी घट होण्याची शक्यता असल्याने काउंटरमधील काही व्यापाऱ्यांनी नफा बुक केला.

डेली चार्टवर निफ्टीने इंट्राडे चार्टवर डबल टॉप फॉर्मेशनसह एक लहान बियरीश कँडल तयार केली. आता निफ्टीला 18000 आणि 17950 वर सपोर्ट दिसत आहे. तर 18200-18250 साठी, त्याच्यासाठी रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

 भारती एअरटेल (BHARTIARTL)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
मारुती (MARUTI)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
ब्रिटानिया (BRITANNIA)
ट्रेंट (TRENT)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ज्युबिलंट फुड्स (JUBLFOOD)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT