Share Market sakal
अर्थविश्व

Share Market: बाजार तेजीसह सुरू, मात्र आयटीच्या 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

आजही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह सुरू झाला.

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केटकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. विकली एक्सपायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी मार्केट रेंजमध्ये राहिल्याचे दिसून आले आणि मार्केट घसरणीसह बंद झाला. आजही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीह सुरू झाला.

सेन्सेक्स 137 अंकाच्या तेजीसह 60,973 वर सुरू झाला तर निफ्टी 50 अंकाच्या तेजीसह 18,100 वर सुरू झाला. (share market opening update 4 November 2022 ndj97)

गुरुवारी सेन्सेक्स 70 अंकांनी घसरून 60836 वर आणि निफ्टी 30 अंकांनी घसरून 18053 वर बंद झाला. बँक निफ्टी खालच्या स्तरावरून 1 टक्क्यांनी वाढला होता. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने तसेच बाजारात अस्थिरता दिसून येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम राहील.

गुरुवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्सची विक्री झाली होती तर त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 25 शेअर्सची विक्री झाली होती. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्सची खरेदी झाली होती. मात्र आज शेअर बाजारात अस्थिरता दिसत असल्याने 37 शेअर्स वर आहे तर 13 शेअर्स खाली आहे.

आज आयटीच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून येत आहे. यात TCS, WIPRO शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
टेक महिन्द्रा (TECHM)
हिन्दाल्को (HINDALCO)
पॉवरग्रीड (POWERGRID)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
एनटीपीसी (NTPC)
व्होल्टास (VOLTAS)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
हिन्दुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)
पेज इंडिया (PAGEIND)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

घर नाही, पाणी नाही… तरीही एल्फिन्स्टन पूल बाधितांवर स्थलांतराचा तगादा! पुनर्वसनावरून वाद पेटला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT