Share Market Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात स्थिरता; सेन्सेक्स 61,319 तर निफ्टी 18,242 अंकावर

काल गुरुनानक जयंतीमुळे बाजार बंद होता

सकाळ डिजिटल टीम

भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्यातील पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. त्यानंतर काल गुरुनानक जयंतीमुळे बाजार बंद होता. आजच्या सकाळच्या सत्रात शेअर मार्केटमध्ये स्थिरता दिसून येत आहे. सेन्सेक्स सेन्सेक्स 122 अंकाच्या तेजीसह 61,319 वर सुरू झाला तर निफ्टी 44 अंकाच्या तेजीसह 18,242 वर सुरू झाला.

सोमवारी अस्थिरतेतही शेवटच्या तासात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स 235 अंकांनी वाढत 61185 वर तर निफ्टी 86 अंकांनी वाढून 18203 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली.

पीएसयू बँक इंडेक्स सुमारे 4.5 वर्षांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. रियल्टी, एफएमसीजी निर्देशांकातही खरेदी दिसली. दुसरीकडे फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्सवर दबाव दिसून आला. 17 जानेवारी 2022 नंतर निफ्टी 18200 च्या वर बंद झाला आहे.

निफ्टी बँक 428 अंकांनी वाढून 41687 वर बंद झाला. मिडकॅप 256 अंकांनी वाढून 31964 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर्समध्ये खरेदी दिसली. त्याच वेळी, निफ्टीचे 50 पैकी 33 शेअर्स वधारले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्स वाढले.


आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

इंट्राडेमध्ये बाजारात मोठी अस्थिरता दिसल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी दिसली. हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास भारतीय इक्विटी मार्केटमध्ये FII कडून खरेदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीने हायर बॉटम फॉर्मेशन राखण्यात सक्षम आहे असे दिसते. पण त्याच वेळी त्याला 18260 च्या आसपास मोठ्या रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. याशिवाय निफ्टीने डेली चार्टवर डोजी कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे.

ट्रेंड-फॉलोइंग ट्रेडर्ससाठी, 18050 आणि 18000 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी 18000 च्या वर राहिला तर तो 18300-18350 च्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे, जर तो 18050 च्या खाली घसरला तर तो 17950-17900 च्या दिशेने जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT