share market.jpg 
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले आहे. सुरवतीच्या सत्रात 700 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली आहे. बाजाराची सुरवात होताच सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घसरण झाली तर, निफ्टी निर्देशांकामध्ये 17, 160 अंकांखाली गेला आहे. आशियाई शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून येत आहे. त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

मागच्या आठवड्यातही शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिकदृष्ट्या निफ्टी 50-डीएमएच्या खाली बंद झाल्याचे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना म्हणाले. यात बियरिश हेड अँड शोल्डर फॉर्मेशनमुळे ब्रेकडाउन दिसून येत आहे. जे आणखी कमजोरीचे संकेत देत आहेत. निफ्टी त्याच्याही खाली आल्यावर 17,150 वर सपोर्ट दिसतो. 17,000 च्या 200-DMA वरही मजबूत सपोर्ट दिसून येत आहे. दुसरीकडे, निफ्टीला 17,700 च्या 20-DMA वर रझिस्टंस दिसत आहे. निफ्टी 17,500 च्या पुट बेसच्या खाली घसरला आहे. यामध्ये, पुढील सपोर्ट 17000 वर दिसतो आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • हिन्दाल्को (HINDLACO)

  • अपोलो हॉस्पिटल्स (APPOLOHOSP)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • एनटीपीसी (NTPC)

  • झी एन्टरटेन्मेंट (ZEEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)

  • ट्रेंट (TRENT)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT