share market sakal media
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सची 1000 अंशांची भरारी

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आली होती

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारातील पडझडीचं सत्र थांबलं आहे. शेअर बाजारात आज चांगली तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आली होती. त्यानंतर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंशांची उसळी झाली असून, निफ्टीमध्येही ४०० अंशांची वाढ दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 1,197 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 346 अंकांनी वधारला आणि 17,234 अंकांवर खुला झाला होता. तर सेन्सेक्स 58,027 अंकांवर खुला झाला होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराने आठवड्याची सुरुवात कमजोर झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.
निफ्टीवर विक्रीचा मोठा दबाव होता. फार्मा वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. यामध्ये मेटल आणि पीएसयू बँकिंगला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी 16,800 च्या खाली गेल्यास निफ्टीमधील मोठी विक्री होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात हलकी पोझिशन घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला.

बेंचमार्क निफ्टीने डेली चार्टवर डार्क क्लाउड कवर फॉर्मेशन तयार केले आहे, जे बियरीश रिव्हर्सलचे संकेत देत असल्याचे एलकेपी सिक्युरीटीजचे रुपक डे म्हणाले. शिवाय निर्देशांक 200DMA च्या खाली घसरला आहे जो पुन्हा एकदा मंदीचा सेट अप दाखवत आहे. त्याचा RSI मंदीच्या क्रॉसओव्हरमध्ये आहे. तो आता ओव्हरसोल्ड झोनच्या दिशेने सरकत आहे.

16,800 वर इंडेक्सला सपोर्ट आहे. याचा अर्थ 16,800 च्या खाली निर्णायक घसरण निफ्टीला आणखी खाली नेऊ शकते. अशा स्थितीत निफ्टी 16,600/16,300 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, निफ्टी वरच्या बाजूने 17,000/17,200 वर रझिस्टंस दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

Kolhapur Election : एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई करा! राजू शेट्टींचा सरकारवर थेट हल्लाबोल

Cold wave alert: कडाक्याची थंडी वाढली, आरोग्याची घ्या काळजी! आरोग्य विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT