कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात.... Sakal
अर्थविश्व

Share Market: सेन्सेक्स 236 तर निफ्टी 58 अंकाच्या वाढीसह सुरु; LIC शेअर्सची सकारात्मक सुरुवात

शेअर बाजाराला मंगळवारी गवसलेला सकारात्मक सूर आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही कायम राहिला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Latest Updates: शेअर बाजाराला मंगळवारी गवसलेला सकारात्मक सूर आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही कायम राहिला. आजही शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात सुरु झाले. सेन्सेक्स 236.42 अंकांच्या वाढीसह 54,554.89वर सुरु झाला, तर निफ्टी 58.85अंकाच्या वाढीसह 16,318.15वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 38 शेअर्स वाढीसह सुरु झाले, तर 12 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

दरम्यान काल शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या आणि सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या एलआयसी शेअर्सची आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात झाली. आज हा शेअर 10.30 अंकांच्या वाढीसह 885.55 वर सुरु झाला. कालच्या दिवसाअखेर एलआयसीचा शेअर 875.25 वर बंद झाला होता.

दरम्यान काल मंगळवारच्या व्यवहारात, निफ्टीच्या 50 पैकी 49 शेअर्समध्ये वाढ झाली, तर सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्समध्ये वाढ दिसली. तर निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1344.63 अंकांच्या म्हणजेच 2.54 टक्क्यांच्या वाढीसह 54,318.47 वर बंद झाला. निफ्टी 417.00 अंकांच्या म्हणजेच 2.63 टक्क्यांच्या वाढीसह 16,259.30 वर बंद झाला.

एलआयसीचा शेअर बीएसईवर मंगळवारी पहिल्या दिवशी 8.04 टक्क्यांनी घसरून 872.70 रुपयांवर बंद झाला. LIC चा IPO त्‍याच्‍या इश्यू प्राईसच्‍या तुलनेत 9 टक्‍क्‍यांच्या सवलतीवर लिस्ट झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT