Share Market Latest Updates  Sakal media
अर्थविश्व

Share Market: आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड, कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

Share Maket: US FED च्या निर्णयामुळे गुरुवारी निफ्टी-सेन्सेक्स दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक वाढले.

शिल्पा गुजर

Share Market Updates: US FED च्या निर्णयामुळे गुरुवारी निफ्टी-सेन्सेक्स दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक वाढले, निफ्टी 17300 च्या जवळ बंद झाला, त्यानंतर बँक निफ्टीने चांगली कामगिरी केली. आयटी वगळता बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक तेजीत राहिले. रियल्टी निर्देशांक 3% पेक्षा जास्त वाढला आहे. ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स 2.5% पेक्षा जास्त वाढले.

शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) 1047 अंकांनी वाढून 57,864 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 312 अंकांनी वाढून 17,287 वर बंद झाला. निफ्टी बँक 680 अंकांनी वाढून 36,429 वर बंद झाला. तर मिडकॅप 393 अंकांनी वाढून 28,978 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स वधारले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये वाढ झाली.

आज शेअर बाजाराचा मूड कसा असेल?

शुक्रवारी बाजार 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. मागील ट्रेडिंग सत्राप्रमाणे शुक्रवारीही बाजार गॅप-अपसह खुला होता. दुसरीकडे स्मॉल आणि मिड-कॅप शेअर्समध्ये जोरदार ऍक्शन दिसून आली. पण चीनमधील कोरोनाची वाढती प्रकरणे आणि चालू असलेला जियो पॉलिटिकल तणाव बाजाराला अनिश्चित ठेवेल असेही ते म्हणाले.

निर्देशांकावर नजर टाकली तर, निफ्टी 17,350 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर आपण त्यात 17,500-17,700 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, घसरण झाल्यास, 16,800-17,000 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत आहे. त्यामुळे जे शेअर्स सध्या मजबूत स्थितीत आहेत अशा सेक्टर्स आणि स्टॉकवर फोकस करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीमागे जी कारणे होती, ती आता जरा नरमल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. त्यामुळे बाजारात तेजी आली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीचा सपोर्ट आता 16,800 वरून 17,000 वर घसरला आहे. जोपर्यंत निफ्टी 17,000 च्या वर राहील तोपर्यंत तो वाढण्याची शक्यता आहे. पुढे 17,450 आणि त्यानंतर 17,600 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17,000 च्या खाली घसरला तर त्यात 16,900-16,800 ची पातळी दिसू शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स ?-

एचडीएफसी (HDFC)

टायटन (TITAN)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

रिलायन्स (RELIANCE)

ट्रेंट (TRENT)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

एसआरएफ लिमिटेड (SRF)

मॅक्स फायनांशियल सर्व्हिसेज (MFSL)

बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT