Share Market Updates | Stock Market News
Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

शिल्पा गुजर

Share market prediction: 2 दिवसांच्या वाढीनंतर, बुधवारी बाजार हलक्या लाल चिन्हात बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला.

फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समुळे दुपारपर्यंत देशांतर्गत बाजारात चांगली मजबूती होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. इंग्लंडमध्ये किरकोळ महागाईची वाढती आकडेवारी आणि फेडच्या अध्यक्षांकडून महागाई कमी करण्याचे आश्वासन यामुळे बाजारातील भावना खराब झाली. पुढे जाऊन जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात झालेली वाढ पाहायला मिळू शकते.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीने चांगली सुरुवात केली आणि गती कायम ठेवली, पण 16,400 च्या जवळ पोहोचल्यानंतर तो पुन्हा घसरला आणि नफा-वसुलीचे वर्चस्व राहिलयाचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. अलीकडील जो नफा होत आहे, तो सूचित करतो की बुधवारची घसरण लाईट स्टँडस्टिल आहे. शॉर्ट टर्म पुलबॅक अजूनही बाजारात कायम आहे. निफ्टी 16,200 च्या आसपास पोहोचल्यावर नवीन खरेदी दिसून येईल. अशा परिस्थितीत, शॉर्ट टर्म व्यापाराच्या दृष्टिकोनातून थोडीशी घसरण ही खरेदीची संधी मानली पाहिजे. निफ्टीचे शॉर्ट टर्म टारगेट 16,500 आहे तर त्याला 16,000 वर शॉर्ट टर्म सपोर्ट आहे.

बुधवारी बाजाराला सुरुवातीचा नफा कायम ठेवता आला नाही आणि मर्यादित मर्यादेत व्यवहार करून थोड्या घसरणीवर बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. वाढत्या व्याजदरामुळे वाढीवर दबाव येण्याची भीतीही बाजाराच्या भावनेवर नकारात्मक परिणाम करत आहे. निफ्टीने डेली चार्टवर एक लहान बिअरिश हॅमर कॅंडलस्टिक तयार केली आहे जी नजीकच्या भविष्यात शेअर बाजार आणखी खाली येण्याचे संकेत देत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
श्री सिमेंट (SHREECEM)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
पर्सिस्टेंट (PERSISTENT)
एल अँड टी (LTTS)
एम फॅसिस (MPHASIS)
लॉरस लॅब (LAURUSLABS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT