Share Market Sakal
अर्थविश्व

केवळ 29 रुपयांचा स्टॉक देईल भरघोस परतावा! कोणता आहे ते पाहुयात

गेल्या एका महिन्यात त्यात सुमारे 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शिल्पा गुजर

गेल्या एका महिन्यात त्यात सुमारे 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज (Prozone Intu Properties) हा एक स्मॉलकॅप स्टॉक (Smallcap Stock) आहे. जो शेअर बाजार तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे. हा स्टॉक (Stock)गेल्या 6 महिन्यांत 30 टक्क्यांनी घसरला आहे, पण आता यात तेजी येताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात त्यात सुमारे 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या स्टॉकला बाउन्सबॅक (Bounceback) दिसू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

निफ्टी (Nifty) रियल्टीमध्ये 10 वर्षांचा ब्रेकआउट दिसत आहे, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, रिअल इस्टेट शेअर्स (Real Estate Shares), विशेषत: कमी किमतीच्या शेअर्समध्ये पुढील 3 महिन्यांत मजबूत वाढ अपेक्षित आहे. पुढील 2-3 महिन्यांत हा शेअर 42 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे. विशेष म्हणजे त्याची सध्याची किंमत केवळ 29 रुपये आहे.

प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजचा (Prozone Intu Properties)स्टॉक 26 ते 30 रुपयांच्या रेंजमध्ये फिरत आहे, पण तो 56.35 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा खूपच खाली दिसत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया म्हणाले. या शेअरमध्ये 32 रुपयांच्या आसपास ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे आणि एकदा ही पातळी ओलांडली की, पुन्हा एकदा 36 रुपयांवर आणि नंतर 42 रुपयांपर्यंत जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या पातळीवर या शेअरमध्ये खरेदी करता येईल. 3 महिन्यांसाठी 42 रुपयांच्या टारगेटसाठी, 25 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवत हा स्टॉक खरेदी करायचा सल्ला त्यांनी दिला आहे.

निफ्टी रियल्टी निर्देशांकाने अलीकडेच 10 वर्षांचा ब्रेकआउट (Breakout) दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या हा स्टॉक रु.24 च्या आसपास सपोर्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हेच लक्षात घेऊन, 24 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवून शॉर्ट टर्म साठी 40-50 रुपयांचे टारगेट ठेवून हा शेअर खरेदी करू शकतो, असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना म्हणाले.

राकेश झुनझुनवाला यांचा प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजमधील पोर्टफोलिओ (Portfolio) पाहिल्यास, त्यांच्याकडे सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 31.50 लाख म्हणजेच 2.06 टक्के हिस्सा होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT