Share Market Sakal
अर्थविश्व

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पडझड; मोठ्या शेअर्सचे कोसळले भाव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आठवड्यातील आजच्या चौथ्या दिवशी (गुरुवार) शेअर बाजार लाल चिन्हासह सुरु झाला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स २५८.५६ अंकांच्या घसरणीसह ६०,८८४.७७ स्तरावर तर नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंजच्या निर्देशांक निफ्टी देखील ७२.२० अंकांच्या घसरणीसह १८,१३८.७५ वर खुला झाला.

सकाळी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा बड्या शेअर्सचे भावही कोसळलेले पहायला मिळाले. यामध्ये इंडसइंड बँक, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, ब्रिटानिया आणि डिविस लॅब्ज या कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हांवर खुले झाले. तर अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, आयटीसी, टायटन कंपनी आणि हिंडाल्कोचे शेअर्सही लाल चिन्हावर सुरु झाले.

काल उच्चपातळीवर झाली होती सेन्सेक्सची सुरुवात

या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी अर्थात काल बुधवारी शेअर बाजार उच्च पातळीवर सुरु झाला होता. त्यावेळी सेन्सेक्स १३.११ अंकांनी वधारत ६१,१२५.१६ च्या पातळीवर तर निफ्टी १.१७ अंकांच्या वाढीसह १,८२७९.१० च्या पातळीवर खुला झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT