शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घरसण झाली आहे. आज सकाळी बाजार घसरणीसह उघडला.
मुंबई - शेअर बाजारात (Share Market) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घरसण झाली आहे. आज सकाळी बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स (Sensex) ३३२ अंकांनी तर निफ्टी (Nifty) २५० अंकांनी घसरला होता. त्यानंतर सेन्सेक्स १००० हजार अंकांनी घसरला होता. तेव्हा निर्देशांक ५६ हजार ४५८.६० वर पोहोचला होता. मात्र पुन्हा हळू हळू बाजार सावरत असून आता सेन्सेक्स २६४ अंकांनी लाल निशाणावर आहे. सध्या निर्देशांक ५७ हजार २२६.६८ इतका आहे. (Share market Updates)
सलग पाच दिवस घसरण सुरुच असून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पाच दिवसात गुंतवणूकदारांचे १९ लाख ५० हजार कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत. सोमवारी सेन्सेक्स १५४५.६७ अकांनी घसरला तर निफ्टीत ४८६.०५ अंकांची घट झाली. गेल्या दोन महिन्यात एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती.
गेल्या पाच दिवसात सेन्सेक्समध्ये एकूण ३८१७.४ अंकांची म्हणजेच ६.२२ टक्के घसरण झाली. यामुळे बाजाराचे भांडवल १९ लाख ५० हजार २८८ कोटींनी घटले. सध्या बाजार भांडवल हे २,६०,५२,१४९ कोटी रुपये इतकं आहे. फक्त सोमवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे ९ लाख १३ हजार ६५१ कोटींचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.