aarthvishwa sakal
अर्थविश्व

सोमवारी शेअर बाजार फ्लॅट बंद; जाणून घ्या कसा असेल आजचा बाजार

सेन्सेक्स 29 अंकांच्या किरकोळ वाढीसह 60,000 च्या पातळीवर बंद झाला.

सकाळ वृत्तसेवा

सोमवारी बाजार फ्लॅट क्लोज झाला. निफ्टी हिरव्या मार्कवर अर्थात तेजीसह 17,855 वर बंद झाला. सेन्सेक्स 29 अंकांच्या किरकोळ वाढीसह 60,000 च्या पातळीवर बंद झाला. यासह, निफ्टी बँकेने 341 अंकांची वाढ नोंदवली.

सोमवारच्या सत्रात बँकिंग, ऑटो, रिअल्टी, हॉटेल आणि मल्टीप्लेक्स शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली.सेन्सेक्स, निफ्टीची रेकॉर्ड क्लोझिंग बघायला मिळाली. निफ्टी बँकेतही रेकॉर्ड क्लोझिंग झाली. निफ्टी बँक पहिल्यांदाच 38,000 च्या वर बंद झाली. सोमवारी ऑटो, रिअल्टी शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. बँकिंग, तेल-वायू, वीजेचे स्टॉक्सही तेजीत राहिले. हॉटेल, मल्टीप्लेक्स शेअर्समध्येही खरेदी दिसली. आयटी, फार्मा, एफएमसीजी स्टॉक्सवर बराच दबाव दिसला.

शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 स्टॉक्स तेजीत राहिले. निफ्टी 2 अंकांनी वाढून 17855 वर बंद झाला आहे. त्याचवेळी सेन्सेक्स 29 अंकांनी वाढून 60,077 वर बंद झाला. निफ्टी बँक 341 अंकांनी वाढून 38171 वर बंद झाली. मिडकॅप 9 अंकांनी वाढून 30152 वर बंद झाला आहे. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी कमकुवत होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 14 पैशांनी कमजोर होऊन 73.84 वर बंद झाला.

सोमवारी 50 निफ्टी शेअर्सपैकी 27 शेअर्सची विक्री झाली. त्याचवेळी सेन्सेक्सच्या 30 पैकी 17 आज अर्थात मंगळवारी 'या' 10 शेअर्सवर नजर ठेवा

  1. मारुती (MARUTI )

  2. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

  3. टाटा मोटर्स (TATAMOTORS )

  4. ओएनजीसी (ONGC)

  5. हिरोमोटोकॉर्प (HEROMOTOCO)

  6. आयआरसीटीसी (IRCTC )

  7. एयुबँक (AUBANK )

  8. गोदरेजप्रॉप (GODREJPROP )

  9. भारतफोर्ज (BHARATFORG )

  10. अमरा राजा बॅटरी (AMARAJABAT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

शिल्पा गुजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Poland Defense: पोलंडमध्ये फ्रान्सची लढाऊ विमाने तैनात

Navaratri 2025: यंदा नवरात्रीत क्लासी ‘स्टाइल स्टेटमेंट’ महिलांना खुणावताहेत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या अन् घागरा

Chinchwad Crime : चिंचवडमध्ये टेम्पो चालकाला लुटले; गुन्हेगारांना अटक

हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

SCROLL FOR NEXT