Share  Market
Share Market  esakal
अर्थविश्व

Share Market : एकाच वर्षात या स्टॉकने दिला 300 टक्के बंपर रिटर्न

सकाळ डिजिटल टीम

Share Market : शेअर बाजारात चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला दमदार रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे योग्य स्टॉकमध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना 300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

एका वर्षात संपत्ती चौपट

जीएम पॉलीप्लास्ट (gm polyplast) या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ही कंपनी प्लास्टिक उत्पादनांच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. मंगळवारी हे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले. हा स्मॉल-कॅप स्टॉक मल्टी-बॅगर आहे. याने केवळ एका वर्षात 300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांची संपत्ती एका वर्षात चौपट झाली आहे.

कंपनी देणार बोनस शेअर्स

जीएम पॉलीप्लास्टचे शेअर्स मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांनी वाढत 787.85 रुपयाया 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले. शेअर्स त्यांच्या अप्पर सर्किटसह बंद झाले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 151.49 कोटी आहे. जीएम पॉलीप्लास्टने बोनस इश्यूसह त्याचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.

कंपनी प्रत्येक एका इक्विटी शेअरसाठी 6:1 गुणोत्तराप्रमाणे प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यूचे 6 इक्विटी शेअर जारी करेल. बोनस इश्यू अंतर्गत, कंपनी 1,15,36,800 इक्विटी शेअर्स जारी करेल. जीएम पॉलीप्लास्टने बोर्डाच्या मंजुरीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत म्हणजे 12 जानेवारी 2023 पर्यंत बोनस शेअर्सचे पेमेंट जाहीर केले.

शेअरमध्ये सतत वाढ

जीएम पॉलीप्लास्टचे शेअर्स सातत्याने वाढत आहे. येत्या काळात आणखी तेजी अपेक्षित आहे. मागील वर्षी 22 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 175 रुपयांवर होते. जे आता 87.85 रुपये झाले आहेत. यावरुनच अंदाज येतो आहे की शेअर्स किती तेजीने पुढे जात आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT