Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 177.87 तर निफ्टी 29.25 अंकांनी वधारला

Share Market: गेल्या आठवड्यापासून सुरु असलेली शेअर बाजाराचा चढता आलेख आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही सुरुच राहिला.

सुरज सकुंडे

Share Market Updates: गेल्या एक आठवड्यापासून सुरु असलेला शेअर बाजाराचा चढता आलेख आज दिवसाच्या सुरुवातीलाही सुरुच राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सलग सहाव्या दिवशी हिरव्या चिन्हात सुरु झाले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 177.87 अंकांच्या वाढीसह 56663.87 वर सुरु झाला. दुसरीकडे, निफ्टी 29.25 अंकांच्या म्हणजेच 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 16,900.65 वर सुरु झाला.

सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी सलग पाचव्या दिवशी हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 935.72 अंकांच्या म्हणजेच 1.68 टक्क्यांच्या वाढीसह 56,486.02 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 240.85 अंकांच्या म्हणजेच 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 16,871.30 वर बंद झाला. सोमवारच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली, तर रियल्टी, फार्मा आणि मेटलमध्ये नफावसूली दिसून आली.

बाजारात तेजीच्या ट्रेंडने कमबॅक केले आहे कारण गुंतवणूकदार आता टॅक्टिकल सेलमधून टॅक्टिकल बायकडे वळत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. कमोडिटीजच्या किमती कमी होत चालल्याने गुंतवणुकीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. FII ची विक्री आणि क्रूडची वाढ थांबली आहे. रशिया-युक्रेनमुळेही सुधारणा दिसत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे भारतीय बाजारपेठ चांगली कामगिरी करताना दिसेल. जगभरातील गुंतवणूकदार व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. भारतातही WPI मध्ये वाढ झाली आहे पण बाजाराने त्याला फारसे महत्त्व दिले नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT