share market sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 120 तर निफ्टी 33 अंकांनी घसरला

सकारात्मक सुरुवातीनंतर आज दिवसअखेर शेअर बाजारात घसरण झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचं सत्र सुरु आहे. आज मात्र शेअर बाजाराला ब्रेक मिळाला. सकारात्मक सुरुवातीनंतर शेअर बाजारात दिवसअखेर घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दिवसअखेर सेन्सेक्स 115.48 म्हणजेच 0.20 टक्क्यांची घसरण होऊन 58568.51वर बंद झाला. तर निफ्टी 33.50 अर्थात 0.19 अंकांची घसरण होऊन 17,464.75वर बंद झाला. निफ्टी 50 मधील 30 शेअर्समध्ये घसरण झाली तर 20 शेअर्स सकारात्मक कामगिरी करू शकले. (Share Market The Sensex fell by 120 points and the Nifty by 33 points)

तत्पूर्वी आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीसह झाली. सेन्सेक्स 95.72 अंकाच्या वाढीसह 58856.30वर सुरु झाला, तर निफ्टी 20.95 अंकांच्या वाढीसह 17519.20वर सुरु झाला. सकाळी 10 वाजेपर्यंत शेअर बाजाराचा चढता आलेख चालूच राहिला.

काल बुधवारी बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण दिसून आले. बाजाराने गेल्या 6 महिन्यांतील उच्चांक गाठला. रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेमुळे ऑटो, आयटी, बँका, कॅपिटल गुड्स आणि रिअॅल्टी स्टॉकमध्ये वाढ झाली. सेन्सेक्स 740.34 अंकांच्या अर्थात 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 58,683.99 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 146.95 अंकांच्या अर्थात 1 टक्क्यांच्या वाढीसह 17,498.25 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT