share market
share market sakal
अर्थविश्व

Share Market : येत्या आठवड्यात 'हे' 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात पैसे कमावणं तसं खूप सोपं आणि म्हणायला गेलं तर खूप अवघडही आहे. योग्य शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला लाखोंची कमाई करता येईल, पण चुकीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर लाखोंची कमाई शुन्यावरही यायला वेळ लागणार नाही. अशात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ मदत करु शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी येत्या आठवड्यात या पाच शेअर्समध्ये खरेदी करायचा सल्ला दिला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

सिएट टायर्सचा स्टॉक या आठवड्यात 1597 रुपयांवर पातळीवर बंद झाला. यासाठी 1640 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे, जी सध्यापेक्षा 4.5 टक्के अधिक आहे. गेल्या आठवड्यात 16 टक्के, एका महिन्यात 17 टक्के आणि तीन महिन्यांत 75 टक्के वाढ झाली आहे.

टाटा मोटर्स (Tata Motors)

टाटा मोटर्सचा शेअर या आठवड्यात 432 रुपयांवर बंद झाला. यासाठी 460 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे, जी सध्यापेक्षा 6.5 टक्के अधिक आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक 3 टक्के आणि एका महिन्यात सुमारे 12 टक्क्यांनी घसरला आहे. फंड मॅनेजर सध्या ऑटो शेअर्सबाबतीत सकारात्मक आहेत. अशा स्थितीत बाजारात होणाऱ्या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहिले जाते.

डाबर (Dabur)

शेअर बाजार तज्ज्ञ अनुज गुप्तांनी डाबरची निवड केली आहे. गेल्या आठवड्यात डाबरचा शेअर 546 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. यासाठी 580 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे, जे सध्यापेक्षा 6.2 टक्के अधिक आहे. हा शेअर एका आठवड्यात सुमारे 5 टक्के, एका महिन्यात सुमारे 6 टक्के घसरला आहे.

गती लिमिटेड (Gati Limited)

गती लिमिटेडचा शेअर 186 वर बंद झाला. त्यासाठी टारगेट 198 रुपये ठेवण्यात आले आहे, जी सध्यापेक्षा 6.5 टक्के अधिक आहे. गेल्या आठवड्यात हा शेअर 9.3 टक्क्यांनी वधारला आहे. एका महिन्यात सुमारे 11 टक्के आणि तीन महिन्यांत 36 टक्के वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT