tata group
tata group sakal
अर्थविश्व

Tata Group : शेअर मार्केटच्या पडझडीत टाटा ग्रुपचा 'हा' शेअर करतोय कमाल

सकाळ डिजिटल टीम

Tata Group : शुक्रवारीही सेन्सेक्स 1.45 टक्‍क्‍यांनी घसरला असला तरी टाटा एलक्‍सी 0.99 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 6662.10 रुपयांवर बंद झाला. कमी पैशाच्या गुंतवणुकीवर या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

बाजारातील तज्ज्ञांना यामध्ये आणि सध्या आणखी तेजीचा कल दिसत आहे, किमान 33 टक्के वाढ या शेअरमध्ये तज्ज्ञांना दिसत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 41,489.19 कोटी आहे. (share market this tata group have given best return in crisis read story)

टाटा एल्क्सीचे शेअर्स 23 जानेवारी 2009 रोजी 41.30 रुपयांवर होते. आता त्याची किंमत 16031 टक्क्यांनी वाढून 6662.10 रुपये झाली आहे. याचा अर्थ 14 वर्षात त्यांनी गुंतवणूकदारांना केवळ 63,000 रुपयांच्या गुंतवणुकीने कोट्यधीश बनवले आहे.

आता आणखी पुढे यात तेजीचा कल दिसत आहे आणि त्याचे शेअर्स सध्या सुमारे 38 टक्क्यांच्या सवलतीत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2022 रोजी तो 10760.40 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होता.

टाटा एल्क्सीने त्याच्या ऑटोमोटिव्ह आणि डिझाईन डिजिटल व्यवसायांच्या बळावर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत प्रथमच 10 कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये 817.7 कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जो तिमाही आधारावर 7.2 टक्के जास्त आणि वार्षिक आधारावर 28.7 टक्के होता.

दुसरीकडे, नफ्याबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 197.7 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो वार्षिक तुलनेत 29 टक्क्यांनी वाढला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म केआर चोक्सीने यामध्ये गुंतवणुकीसाठी 8884 रुपयांचे टारगेट देत स्टॉकचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे.


नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT