Share Market  sakal
अर्थविश्व

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शेवटी सेन्सेक्स 452.90 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी घसरून 59,900.37 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 132.70 अंकांच्या म्हणजेच 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 17,859.45 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

जागतिक मंदीची भीती आणि व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे बाजारावर परिणाम झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी सांगितले. गुंतवणूकदार विक्रीच्या मागे लागल्याने सेन्सेक्स 60,000 च्या पातळीच्या खाली गेला.

याशिवाय बाजारातील व्हॅल्यूएशनही महाग दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार बँकिंग, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये विक्री करताना दिसत आहेत.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीने डेली आणि इंट्राडे चार्टवर लोअर टॉप फॉर्मेशन तयार केले आहे. निफ्टी सतत त्याच्या 50 आणि 20-दिवसांच्या एसएमएखाली ट्रेडिंग करत आहेत, जे बाजारासाठी नकारात्मक आहे.

मार्केट आता ओव्हरसोल्ड दिसत असले तरी अशा स्थितीत पुल बॅक रॅलीची शक्यता आहे. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी पहिला रझिस्टंस 18000 वर दिसत आहे. जर निफ्टीने याच्या वर न गेल्यास 17750 च्या दिशेने घसरताना दिसेल.

त्यानंतर निफ्टी 17650 च्या दिशेनेही जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टीने 18000 चा रझिस्टंस ओलांडला तर तो 18100-18175 च्या दिशेने जाताना दिसेल.

निफ्टीला डेली टाईम फ्रेमवर आधीच्या स्विंग लो वर सपोर्ट मिळत असल्याचे दिसून आल्यााचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. मोमेंटम इंडिकेटर आरएसआयही (14) बियरीश क्रॉसओवर दाखवत आहे.

येत्या काळात बाजारातील कमजोरी कायम राहण्याचे हे लक्षण आहे. निफ्टीला 17770 वर सपोर्ट दिसत आहे. निफ्टीला हा सपोर्ट सांभाळता आला नाही तर ही घसरण 17500 पर्यंत वाढू शकते. त्याच वेळी, पहिला रझिस्टंस 18000 वर आहे. जर निफ्टीने हा अडथळा पार केला, तर त्यात रिकव्हरी दिसू शकते.

  • आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • बीपीसीएल (BPCL)

  • ओएनजीसी (ONGC)

  • ट्रेंट (TRENT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • ए यू बँक (AUBANK)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT