अर्थविश्व

शेअर बाजार सावरला; जेरॉम पॉवेल यांच्या भाषणाकडे जगाचे लक्ष 

वृत्तसंस्था

मुंबई: शेअर बाजारात सकाळच्या सत्रात झालेल्या घसरणीनंतर बाजार आता सावरला आहे. केंद्र सरकार परकी गुंतवणुकीवरील अधिभार मागे घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण किंचित कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 350 अंशांनी घसरत 36 हजार 102.35 पातळीवर पोचला होता. तसेच निफ्टीने 10 हजार 637.15 अंशांची इंट्राडे नीचांकी पातळी गाठली होती. आता दोन्ही निर्देशांक सावरले आहे. सेन्सेक्स 12 अंशांच्या किरकोळ घसरणीसह 36 हजार 460 अंशांवर व्यवहार करतो आहे. निफ्टी सावरला असून 10 हजार 758.70 अंशांवर व्यवहार करतो आहे. 

सध्या देशात आर्थिक मंदीचे वारे वाहत आहेत. त्यात देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रहमण्यम यांनी उद्योगांना सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी निराशा पसरली होती. तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या होणाऱ्या भाषणाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT