Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : 'या' शेअर्समध्ये तब्बल 11% तेजी; 3 महिन्यात गुंतवणूकदारांना केले मालामाल

हा शेअर सध्या ऑल टाईम तेजीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. कधी बाजारात तेजी दिसते तर कधी घसरण दिसून येते. अशा कमजोर बाजारात पोन्नी शुगर्सच्या (Erode) शेअर्समध्ये गुरुवारी 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या शेअरने इंट्रा-डे दरम्यान 479.15 रुपयांचा ऑल टाईम तेजीत आहे. तीन महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना 100% परतावा दिला आहे. 28 सप्टेंबरला शेअरची किंमत 240 रुपये होती.

या शेअरचा मागील उच्चांक 19 डिसेंबरला 455 रुपये होता. गुरुवारी बाजार बंद होताना हा शेअर 470 रुपयांवर गेला.

गेल्या एका महिन्यात सेन्सेक्समधील 3.4 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत हा शेअर 52.45 टक्क्यांनी वाढला आहे. इथेनॉलवरील वस्तू आणि सर्व्हिस टॅक्स (GST) दर कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या आशेने आणि अतिरिक्त साखरेला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे साखरेच्या किमती वाढतील असे कंपनीने सांगितले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

28 ऑक्टोबरला सप्टेंबर तिमाहीचे (Q2FY23) निकाल जाहीर करताना, पोन्नी शुगर्सने (Erode) H2FY23 मध्ये (ऑक्टोबर-मार्च) आपली मजबूत कामगिरी चालू ठेवण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

नवीन ब्राझिलियन पीक येण्यापूर्वी देशाला पुढील 5-6 महिन्यांत निर्यात वाढवण्याची नितांत गरज असल्याचेही कंपनीने म्हटले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT