Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात घसरण, Sensex आणि Nifty मध्ये उतार

आज दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभराच्या अस्थिरतेसह शेअर बाजार तेजीत बंद झाला. मात्र आज दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 186 अंकाच्या घसरणीसह 54,335 वर सुरू झाला तर निफ्टी 54 अंकाच्या घसरणीसह 16,223 सुरू झाला.

आज शेअर बाजारात शेअर्समध्ये 41 तेजी दिसून येत आहे तर 9 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक दिसून येणार

सोमवारी पहिल्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळाली. हेवीवेट स्टॉक्स आणि सर्व क्षेत्रातील खरेदी यामुळे सेन्सेक्स 760.37 अंकांनी म्हणजेच 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 54,521.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 229.30 अंकांच्या म्हणजेच 1.43 टक्क्यांच्या वाढीसह 16,278.50 वर बंद झाला

चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारातील वातावरण सुधारले आणि सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे सेन्सेक्स 54000 च्या वर बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे काही शेअर्स अतिशय आकर्षक किंमतींवर आहेत. अशा स्थितीत आयटी, मेटल आणि टेलिकॉम शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
इन्फोसिस (INFY)
टेक महिन्द्रा (TECHM)
बजाज फायनान्स (BAJAJFINSV)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
व्होल्टास (VOLTAS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT