Share Market Update esakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळाली.

शिल्पा गुजर

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळाली.

Share Market Update : गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळाली. पॉझिटीव्ह जागतिक संकेत आणि यूएस फेडने व्याजदरात केलेली अपेक्षित वाढ यामुळे बाजारात चांगल्या वातावरणासह खरेदी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1041.47 अंकांच्या म्हणजेच 1.87 टक्क्यांच्या वाढीसह 56,857.79 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 287.80 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या वाढीसह 16,929.60 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

गॅप ओपनिंगसह, निफ्टी (Nifty) गुरुवारी 16750 च्या आसपास स्विंग हायवर जाताना दिसला आणि त्याने 16800 हा जूनचा उच्चांक ओलांडल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गुरुवारी दिवसभर बाजारात तेजी कायम राहिली. अशा परिस्थितीत, 16750-16800 हा निफ्टीसाठी आता निअर टर्म सपोर्ट झोन बनला आहे.जोपर्यंत निफ्टी या सपोर्ट झोनच्या वर राहील तोपर्यंत तो 17000 च्या पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर निफ्टीने 17000 ची पातळी ओलांडली, तर तो 17200 पर्यंत जाताना दिसतो.

निफ्टी पूर्वीच्या स्विंग हायच्या वर गेल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. यात आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत. याशिवाय, शॉर्ट टर्म मूव्हिंग अॅव्हरेजचा तेजीचा क्रॉसओव्हरही निफ्टीमध्ये तेजी येण्याचे संकेत देत आहे. आता निफ्टीसाठी वरच्या दिशेने 17000 आणि 17200 वर रझिस्टंस दिसत आहे. तर खाली 16700 वर सपोर्ट आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORGE)

  • एल अँड टी (LT)

  • एमआरएफ (MRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT