share market update lic ipo Curiosity about LIC listing price mumbai sakal
अर्थविश्व

एलआयसीचे आज लिस्टिंग भावाबाबत उत्सुक्तता ताणली

सरकारतर्फे हा इशू साठ हजार कोटी रुपयांचा निश्‍चित झाला होता. मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे जगातील सर्वच शेअर बाजार कोसळल्यानंतर हा इश्यू जेमतेम एकवीस हजार कोटींचा आणला गेला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एलआयसीच्या बहुचर्चित आयपीओला तिप्पट प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या शेअर्सचे व्यवहार उद्यापासून शेअर बाजारात सुरू होणार आहेत. त्यामुळे उद्या त्याला काय किंमत मिळते याबाबत गुंतवणूकदारांची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. सुरुवातीला सरकारतर्फे हा इशू साठ हजार कोटी रुपयांचा निश्‍चित झाला होता. मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे जगातील सर्वच शेअर बाजार कोसळल्यानंतर हा इश्यू जेमतेम एकवीस हजार कोटींचा आणला गेला.

त्याला तिप्पट प्रतिसाद मिळाल्यामुळे व्यवहार सुरू झाल्यावर या शेअरला चांगला भाव मिळेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा होती. मात्र दरम्यानच्या काळात रिझर्व बँकेने रेपो रेट वाढवल्यामुळे शेअर बाजार अजून कोसळले. त्यामुळे उद्या नोंदणीनंतर शेअर बाजारात एलआयसी शेअरचा भाव काय राहील याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. जरी भाव वरखाली झाले तरी गुंतवणुकदारांनी हवालदिल न होता दीर्घकालीन लक्ष्य ठेऊन व्यवहार करावेत, असे तज्ञांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT