Share Market Latest News Updates sakal
अर्थविश्व

Share Market: दमदार सुरुवातीनंतर जोरदार घसरण; सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी घसरला

शेअर बाजारातील घसरणीचं सत्र आज सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: शेअर बाजारातील घसरणीचं सत्र आज सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिले. दमदार सुरुवातीनंतर दिवसभरात शेअर बाजारात सातत्याने घसरण होत राहिली आणि दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 136.69 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून 52793.62वर बंद झाला तर निफ्टी 25.85 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 15,782.15वर बंद झाला. निफ्टी 50 मधील 25 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 25 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

टाटा मोटर्स (TATAMOTORS), सनफार्मा (SUNPHARMA), महिंद्रा अॅण्ड महिंद्रा (M&M), हिंदुस्तान युनिलिव्हर (HINDUNILVR), टायटन (TITAN) हे शेअर्स आजचे टॉप गेनर्स ठरले. तर HINDALCO, SBIN, JSWSTEEL, ICICIBANK, BHARTIART या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

तत्पूर्वी आज सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅप अप ओपनिंग दिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 635.43 अंकांनी वधारून 53,565.74 वर सुरू झाला. तर निफ्टी 169 अंकांनी वधारून वर 15,977.00 सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT