Share Market
Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

कच्च्या तेलाच्या दरातही घसरण झाल्याने बाजाराने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Share Market : बुधवारी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाला. व्यवहाराअंती सेन्सेक्स 629.91 अंकांच्या म्हणजेच 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 55,397.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 180.30 अंकांच्या म्हणजेच 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 16,520.85 वर बंद झाला.

देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील (Global Market) चांगल्या संकेतांसह तेल उत्पादक कंपन्यांवर लागू होणार्‍या विंडफॉल करात कपात केल्यामुळे बाजाराला बूस्ट मिळाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले. याशिवाय अमेरिकेतील (America) मजबूत तिमाही निकालांनीही बाजाराला सपोर्ट मिळाला. FII ची खरेदी चालू राहिली तर देशांतर्गत बाजारात आणखी तेजी दिसून येईल, असेही ते म्हणाले.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

आयटी, निवडक मीडिया आणि रिअॅल्टी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बुधवारी बाजार वाढीसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस फेड आपल्या पुढील बैठकीत फार आक्रमकपणे व्याजदर वाढवणार नाही, असा बाजाराचा अंदाज आहे. दरम्यान, कमोडिटी आणि कच्च्या तेलाच्या दरातही घसरण झाल्याने बाजाराने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास, निफ्टीने त्याच्या प्रमुख रझिस्टंस लेव्हलजवळ एक लहान बियरिश कँडल तयार केली आहे. बाजार तात्पुरत्या ओव्हरबॉट स्थितीत असल्याचे दिसते. त्यामुळे उच्च स्तरावर काही नफा-वसुली दिसून येईल. बुल्ससाठी 16,550 आणि 16,600 रझिस्टंस आहे, तर खाली 16,450-16,400 वर सपोर्ट दिसत आहे.

निफ्टी बुधवारी अप-गॅप ब्रेकआउट करताना दिसला पण त्याच्या इंट्राडे लोच्या जवळ बंद झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. जो उच्च पातळीवर प्रॉफिट बुकिंग दाखवत आहे. तर व्हॉल्यूम एक्सपान्शन पुढील अपट्रेंडसाठी सपोर्ट करताना दिसत असला तरी, निफ्टी पुढील 1-2 दिवसांत 16359 वर तयार झालेला अपगॅप भरून काढू शकतो का हे पाहावे लागेल. असे झाले तरच निफ्टी आणखी वाढेल. निफ्टी नजीकच्या काळात 16,359-16,646 च्या दरम्यान फिरताना दिसेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • टेक महिन्द्रा(TECHM)

  • टीसीएस (TCS)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • एल अँड टी (LTTS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • डिक्सन (DIXON)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट (Crypto Market), शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT